Balshastri Jambhekar in Marathi - बाळशास्त्री जांभेकर मराठी

तर, मित्र-मैत्रीनिंनो आज आपण आधुनिक महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक ,मराठी वृत्तपत्राचे जनक, पहिले इतिहास संशोधक अशा विविध संबोधनांनी ज्यांचा गौरव केला जातो ,असे थोर महापुरुष आ. बाळशास्त्री जांभेकर (balshastri jambhekar) यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

 
 
संपूर्ण नाव
बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर
इतर नावे
आचार्य , मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक
जन्म
६ जानेवारी १८१०  (पोंभुर्ले गाव
तालुका. देवगड, जिल्हा. सिंधुदुर्ग
महाराष्ट्र राज्य)
कार्य
समाज प्रबोधन
व्यवसाय
पत्रकारिता, साहित्य
प्रसिद्ध कामे
दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले.
पहिले लिहिलेले पुस्तक
शून्यलब्धी
भाषा अवगत :
बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी,
 तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या दहा भाषांचे ज्ञान होते.
 विषयांचे ज्ञान
रसायनशास्त्र , भूगर्भशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, न्यायशास्त्र,
इतिहास, मानसशास्त्र.
शोध निबंध
एशियाटिक सोसायटी’च्या त्रैमासिकात शोधनिबंध लिहिणारे ते पहिले
भारतीय होते.
हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास
एलिफिन्स्टनकृत हिंदुस्थानांच्या आधारे त्यांनी इतिहास रचला.
हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास हा ग्रंथ 1851 साली त्यांच्या
 निधनानंतर प्रसिद्ध झाला.
इतर ग्रंथ
नीतिकथा, बालव्याकरण, भूगोलविद्या, सारसंग्रह, इंग्लंड देशाची बखर,
इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप, ज्ञानेश्वरी (1845 ला पहिली मुद्रित आवृत्ती काढली.)
मृत्यू
17 मे 1846


  • ·       जन्म : ६ जानेवारी १८१०  

   आ. बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म ६ जानेवारी १८१० रोजी महाराष्ट्र राज्यातील (पोंभुर्ले, ता-देवगड, जिल्हा-सिंधुदुर्ग) येथे झाला. जांभेकर यांच्या वडिलांचे नाव गंगाधरशास्त्री जांभेकर हे होते. जांभेकरांना बालावस्थेपसुनच शिक्षणाची, लिखाणाची आवड होती. आज  ६ जानेवारी हा जांभेकरांचा जन्मदिन ‘ पत्रकार दिन ‘ म्हणून साजरा केला जातो.

balshastri jambhekar


 

  • ·       प्रारंभिक जीवन आणि शिक्षण:

जांभेकरांनी बालपणी वडिलांकडे घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास केला. इ.स. १८२५ साली ते मुंबईला रवाना झाले. मुंबईस येऊन ते सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ला यांच्याकडे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले. या दोन विषयांबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी भरपूर अभ्यास करून प्रावीण्य मिळविले. ‘बॉंबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत कोणाही भारतीयाला तोवर न मिळालेली प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्याइतपत ज्ञान कमवले. इ.स. १८३४ साली एल्फिन्स्टन कॉलेजात पहिले एतद्देशीय व्याख्याते म्हणून जांभेकरांची नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी उच्च शिक्षण करत आपले न्यान वाढविले.
 

  • v मराठी भाषेतील पहिल्या वृत्तपत्राची स्थापना – दर्पण

  • ·       वृत्तपत्राची सुरुवात

मुंबईतल्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असताना व समाजात वावरताना बाळशास्त्रींना अनेक समस्या अस्वस्थ करीत. पारतंत्र्याने ग्रासलेला देश, याबरोबरच समाजातील अनेक रूढी, चालीरीती, अज्ञान, दारिद्ऱ्य, भाकड समजुती यामुळे एतद्देशीय समाज कसा व्याधिग्रस्त झाला आहे, या विचाराने ते चिंता करीत. केवळ महाविद्यालयात शिकवून उपयोग नाही; तर संपूर्ण समाजालाच धडे दिले पाहिजेत. ते करायचे असेल तर समाजाचेच प्रबोधन करावे लागेल, असे त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी वृत्तपत्र काढावे, असे त्यांना वाटू लागले. या जाणिवेतून आपले सहयोगी गोविंद विठ्ठल कुंटे उर्फ भाऊ महाजनांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. 6 जानेवारी 1832 रोजी दर्पणचा पहिला अंक प्रकाशित झाला. या वृत्तपत्रात इंग्रजी व मराठी भाषेमध्ये मजकूर असायचा.

  • ·       वृत्तापत्राचा उद्देश

या वर्तमानपत्राचा उद्देश हा स्वदेशीय लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा आणि लोकांना त्या देशांची समृद्धी व येथील लोकांचे कल्याण याविषयी स्वतंत्र विचार करता व्हावा हा होता.

·       वृत्तपत्राची किंमत:   

जांभेकर यांनी आपले पत्र सामान्य जनते पर्यंत, गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी त्या पत्राची किंमत एक रुपया एवढी ठेवली.

·       वृत्तपत्रा विषयी इतर महत्वाची माहिती

इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषांत प्रकाशित होणाऱ्या या वृत्तपत्राच्या अंकात दोन स्तंभ असत. उभ्या मजकुरात एक स्तंभ (कॉलम) मराठीत आणि एक इंग्रजीत असे. मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि इंग्रजी मजकूर वृत्तपत्रात काय लिहिले आहे, हे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी होता.

वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी लोकांना नवीन होती. त्यामुळे दर्पणचे वर्गणीदार सुरुवातीच्या काळात खूप कमी होते. पण हळूहळू लोकांमध्ये ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. दर्पणवर प्रथमपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता. दर्पण हे वृत्तपत्र साडे आठ वर्षे चालले आणि 25 जून 1840 मध्ये त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. मासिकाची सुरुवात : दर्पण वृत्तपत्रासोबत मराठीतले पहिले मासिक ‘दिग्दर्शन’ त्यांनी इ.स. 1840 साली सुरू केले.

  • सामाजिक सुधारणा: 

जांभेकर हे केवळ पत्रकारच नव्हते , महिला आणि अत्याचारित जातींच्या हक्कांसाठी वकिली करणारे सक्रिय समाजसुधारक होते.त्यांनी अनेक समाजसुधारकांचे वैशिष्ट्ये आपल्या अंगी सामावून घेतली. ज्योतिराव फुले यांसारख्या समाजसुधारकांच्या नेतृत्वाखालील सामाजिक सुधारणा चळवळीचे ते समर्थक होते आणि त्यांनी शिक्षण आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य केले.

  • संदर्भग्रंथ 

  • १९६३ - "न्यू यॉर्क राज्याच्या कामगारांच्या भरपाई कायद्याचा तुलनात्मक अभ्यास"
  • १९६५ - "स्वीडनमधील नागरी प्रक्रिया"
  • १९७७ - "यू.एस. कोडमध्ये लैंगिक पूर्वाग्रह"
  • १९८७ - "लिंग आणि संविधान"
  • २०१६ - "माझे स्वतःचे शब्द"

  •  सन्मान 

  • १९९८ - अमेरिकन बार असोसिएशन कडून थर्गड मार्शल पुरस्कार प्राप्त
  • २००२ - राष्ट्रीय महिला हॉल ऑफ फेम 
  • २०१५ - स्वातंत्र्याचे राष्ट्रपती पदक प्राप्तकर्ता
  • २०१५ - टाईम मॅगझिनच्या जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक
  • २०१९ - ACLU चा जीवनगौरव पुरस्कार

बाळशास्त्री जांभेकर मराठी,


 

  •  FQA 

  1. मराठीतील पहिले पत्रकार कोण आहेत?
  2. दर्पण या वृत्तपत्राचे संपादक कोण होते?
  3. जागतिक पत्रकार दिन कधी असतो?
  4. वृत्तपत्र म्हणजे काय?
  5. वृत्तपत्राच्या प्रमुखास काय म्हणतात?
  6. भारतीय भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते?
  7. दर्पणचा उपयोग काय?
  8. 1832 मध्ये साप्ताहिक दर्पण कोणी सुरू केले?
  9. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र कोणते?
  10. मराठी वृत्तपत्राचे योगदान काय?
  11. दर्पण कधी सुरू झाले?