इतिहास आणि त्याची साधने म्हणजे काय? इतिहास या शब्दाचा अर्थ काय? -| इतिहासाची साधने -|itihasachi sadhane

            

   परिचय :-     

             इतिहास, इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारची सुसंगत मांडणी म्हणजे इतिहास होय. स्थल, काल, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे चार प्रमुख स्तंभ आहेत. या ४ घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. 

            आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तीत्वात आहेत. त्यांनी कोरून ठेवलेले विविध लेख आपल्याला सापडले आहेत. या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास कळू शकतो. याशिवाय चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागतपत्रे यांच्या आधारे आपलयाला इतिहास कळतो. या सर्वांना इतिहासाची साधने म्हणतात. 

             इतिहासाची साधने तीन प्रकारची आहेत : भौतिक साधने , लिखित साधने , मौखिक साधने. 

 

१ ) भौतिक साधने :-


            दैनंदित जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो. पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आज  आपल्याला महत्वाची माहिती पुरवू शकतात. पुरातन काळातील वस्तूंमधील खापराच्या तुकड्यांचे आकार,रंग, नक्षी यावरून ही भांडी कोणत्या काळातील असावी याचा अंदाज बांधला येतो. 

            धान्य , फळांच्या बिया आणि प्राण्यांची हाडे यारून आहाराची माहिती मिळते. वेगवेगळ्या काळात माणसांनी बांधलेल्या घरांचे आणि इमारतींचे अवशेष सापडतात. या सर्वांच्या सहाय्याने मानवी व्यवहारांची माहिती होते. या वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची 'भौतिक साधने' म्हणतात. 


 २ ) लिखित साधने :- 


            अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रातून व्यक्त केल्या आहेत. हजारो वर्षे उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली.

            माणूस सुरुवातीला प्रतीके, चिन्हे यांचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत असे. त्यापासून लिपीचा विकास होण्यास हजारो वर्षे जावी लागली. 

             सुरुवातीच्या काळात खापरे, कच्च्या विटा , झाडाची साल, भूजापत्रे यांसारख्या साहित्याचा लिहिण्यास्तही उपयोग केला जाई. अशा प्रकारच्या साहित्यावरील मजकूर एखाद्या अणकुचीदार साधनाने कोरलेला असे. अनुभव व ज्ञान जसजसे वाढत गेले, तसतसे त्याने विविध पद्धातीने लेखन करण्यास सुरुवात केली. सभोवताली घडलेल्या घटना, दरबारी कामकाजाचे वृत्तांत इत्यादी माहिती लिहून ठेवण्याची पद्धत सुरु झाली. अनेक राजांनी आपलय आज्ञा, निवाडे, दानापत्रे दगडांवर किंवा तांब्याच्या पात्यांवर कोरून ठेवली आहेत. कालांतराने वाङ्मयाचे अनेक प्रकार निर्माण झाले. धार्मिक-सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ, नाटके, काव्ये, प्रवासवर्णने, तसेच शास्त्रीय विषयांवरील लेखन झाले. या साहित्यातून त्या त्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते. या सर्व साहित्याला इतिहासाची साधने म्हणतात.


३ ) मौखिक साधने :- 


              ओव्या, लोकगीते, लोककथा, यांसारखे साहित्य लिहून ठेवलेले नसते. त्याचा करता अज्ञात असतो. ते पिढ्यानपिढ्या जतन झालेले असते. अशा साहित्याला मौखिक साहित्याने जतन झालेले साहित्य असे म्हणतात. ओव्या, लोकगीते, लोककला यांसारखे लोकसाहित्याचे प्रकार यांचा त्यात समावेश होतो. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची " मौखीक साधने " म्हणतात.


ओवी :- 

पांडुरंग पिता | रुक्मीन माझी बया | 
आषाढ वारियेला | पुंडलिक आला न्याया | 
*( उज्जयिनी )
   


नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ's 
  1. इतिहास आणि त्याची साधने म्हणजे काय?
  2. इतिहासाची मौखिक साधने म्हणजे काय?
  3. साधन म्हणजे काय?
  4. इतिहास या शब्दाचा अर्थ काय?
  5. इतिहास म्हणजे काय इयत्ता सहावी?