का साजरा केला जातो नाम विस्तार दिन ? काय आहे त्या मागचा इतिहास ? Babasaheb Ambedkar Marathwada University (BAMU)
का साजरा केला जातो नाम विस्तार दिन ? काय आहे त्या मागचा इतिहास ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ २०२४
औरंगाबाद :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज नामविस्तार दिन. त्यानिमित्ताने देशभरातून अनेक अनुयायी विद्यापीठ गेट वर एकत्र येतात आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्याला मानवंदना देतात. हा लढा फक्त विद्यापीठाची पाटी बदलणारा नव्हता, तर टो समता, स्वातंत्र्य, बंधुता प्रस्थापित करण्यासाठी होता.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी 17 वर्षे आंदोलन सुरु होते. १९९४ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतरण झाले. १४ जानेवारी हा दिवस नामांतर सोहळा म्हणून औरंगाबाद मध्ये मोठ्या आनंद उत्साहाने साजरा करतात. कोरोनामुळे मागील २ वर्षे अभिवादनाचा सोहळा होऊ शकला नव्हता. पण या वर्षी २०२४ मध्ये या सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे.
नामांतर सोहळ्याच्या लढ्यावर एक नजर टाकूया
1972ला दलित पॅंथरची स्थापना झाली.
गायरान जमिनी मिळाव्यात, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ व्हावी, यासह इतर मागण्यांसाठी दलित पॅंथरचं आंदोलन सुरू होतं.
त्या बरोबरच औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे, ही मागणीनं जोर धरला.
1974च्या मराठवाडा विकास आंदोलनात नामांतराची मागणी झाली. दलित युवक आघाडी ही नामांतराच्या मागणीचा पाठपुरावा करत असे .
1977ला तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी मागणीची दखल घेतली
1977ला तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी या मागणीची दखल घेतली. नामांतराचं आश्वासनही दिलं. 1978ला महाराष्ट्रात सरकार बदललं.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोद सरकार सत्तारूढ झालं होतं . विधान परिषदेत आमदार पा. ना. राजभोज यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करावे, अशी मागणी लावून धरली.
27 जुलै 1978ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशी घोषणा झाली.
दलित पँथर नेते प्रा. अरुण कांबळे यांनी या नामविस्तारास विरोध दर्शविला. पँथरला निर्भेळ नामांतर हवे होते.
रात्रीतून नामांतर विरोधात दंगली सुरू झाल्या. एक दीड वर्ष मराठवाडा धुमसत होता. या आंदोलनात अनेकांनी प्राणांची आहुती दिली
शेवटी एका विद्यापीठाची फाळणी झाली. एकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद तर दुसऱ्याला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अशी विस्तारित नावं दिली गेली.
तो नामविस्तार दिन 14 जानेवारी म्हणून मोठ्या उत्साहाने औरंगाबाद येथे साजरा केला जातो.
