Balshastri Jambhekar in Marathi - बाळशास्त्री जांभेकर मराठी
तर, मित्र-मैत्रीनिंनो आज आपण आधुनिक महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक ,मराठी वृत्तपत्राचे जनक, पहिले इतिहास संशोधक अशा विविध संबोधनांनी ज्यांचा गौरव केला जातो ,असे थोर महापुरुष आ. बाळशास्त्री जांभेकर ( balshastri jambhekar ) यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. संपूर्ण नाव बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर इतर नावे आचार्य , मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक जन्म ६ जानेवारी १८१० ( पोंभुर्ले गाव तालुका. देवगड , जिल्हा. सिंधुदुर्ग महाराष्ट्र राज्य) कार्य समाज प्रबोधन व्यवसाय पत्रकारिता , साहित्य प्रसिद्ध कामे दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले. पहिले लिहिलेले पुस्तक शून्यलब्धी भाषा अवगत : बाळशास्त्रींना मराठी , संस्कृत , बंगाली , गुजराती , कानडी , तेलुगू , फारसी , फ्रेंच , लॅटिन व ग्रीक या दहा भाषांचे ज्ञान होते. विषयांचे ज्ञान रसायनशास्त्र , भूगर्भशास्त्र , प्राणिशास्त्र , वनस्पतीशास्त्र , न्यायशास्त्र , इतिहास , मानसशास्त्र. शोध निबंध ‘ एशियाटिक सोसायटी’च्या त्रैमासिकात शोधनिबंध लिहिणारे ते पहिले भारतीय होते. हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास एलिफिन्स्टनकृत ह...